श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्या स्थापना दिनाच्या औचित्त्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्या स्थापना दिनाच्या औचित्त्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

देवरुख -श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखचा स्थापना दिन गुरुवार,दि. २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने कार्यकारी मंडळ आणि कर्मचारी वृंदातर्फे ग्रंथपूजा, श्री सत्यनारायण पूजा आणि त्यानंतर पुढील तीन दिवस व्याख्याने आणि कथा अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्थापना दिन कार्यक्रमाचा प्रारंभ गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १०:०० वा ग्रंथपूजा आणि सत्यनारायण पूजेने करण्यात येणार आहे. याच दिवशी सायं. ४:०० ते ५:१५ या वेळात ‘ज्योती महिला मंडळ, देवरुख’ यांचे सुश्राव्य भजन, त्यानंतर सायंकाळी ५:३० वा मा. श्री. मदनजी मोडक यांच्या ‘ प्रयागराज महाकुंभ अनुभव कथनाचा’ कार्यक्रम आयोजित केला आहे.

शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सायं. ठीक ५:०० वा. मा.प्रा. श्री कृष्णाजी कुलकर्णी, गोवा यांचे ‘जयवंत दळवी यांचे समग्र साहित्य‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि. १ मार्च रोजी सायं. ५:०० वा. ॲड . श्री विलास कुवळेकर, लांजा यांचे ‘भयसम्राट नारायण धारप’ या विषयावर व्याख्यान, तर कार्यक्रमाची सांगता रविवार दि.२ मार्च रोजी सकाळी ठीक १०:०० वा. मा. श्रद्धा वझे, कल्याण यांच्या ‘कथा अभिवाचन’ या कार्यक्रमाने होणार आहे. तरी सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरूखने आयोजित केलेल्या या ४ दिवसीय कार्यक्रमांचा आस्वाद देवरुख परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कार्यकारी मंडळ आणि कर्मचारी वृंदानी केले आहे.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]