मद्यधुंद चालकाचा तालुकाप्रमुखावर हल्ला; चालकाचे निलंबन व गुन्हा दाखल

मद्यधुंद चालकाचा तालुकाप्रमुखावर हल्ला; चालकाचे निलंबन व गुन्हा दाखल.  

 

देवरूख देवरूख एस.टी. आगारातील अनागोंदी कारभार आणखी एका गंभीर घटनेमुळे चर्चेत आला आहे. गुरुवारी (ता. २७) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आगारातील चालक-सहवाहक संतोष राठोड याने मद्यधुंद अवस्थेत शिवसेना (ठाकरे गट) संगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर यांच्यावर हल्ला केला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संतोष राठोड याचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. तसेच, देवरूख पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना कशी घडली?

गुरुवारी दुपारी संतोष राठोड हा ड्युटी लावण्यावरून अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालत होता. तो पूर्णतः मद्यधुंद अवस्थेत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उध्दट वर्तन करत होता. यावेळी त्याने अश्लील आणि अरवाच्च भाषेत शिवीगाळ केली. अधिकाऱ्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मद्याच्या प्रभावाखाली तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

याच वेळी शिवसेना (ठाकरे गट) संगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर आगारात आले होते. वाहतूक निरीक्षक कैलास साबळे यांच्या दालनात काही कामानिमित्त ते उपस्थित होते. अचानक संतोष राठोड याने बोरूकर यांच्यावर हेल्मेटने हल्ला केला. या हल्ल्यात बोरूकर यांच्या कानाला दुखापत झाली.

 

पोलीस तक्रार व पुढील कारवाई

 

या प्रकारानंतर वाहतूक निरीक्षक कैलास साबळे यांनी त्वरित देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलीसांनी संतोष राठोड याच्या विरोधात संबंधित कायदेशीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, एस.टी. प्रशासनाने त्याचे तात्काळ निलंबन केले आहे.

आगारातील गैरव्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

देवरूख एस.टी. आगार आधीच विविध समस्यांमुळे चर्चेत आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक, शिस्तभंग, वाहतूक व्यवस्थेतील उणिवा आणि अंतर्गत कारभार यावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेमुळे आगारातील सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, संतोष राठोड यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें