राजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी-अणसुरे रस्त्याच्या कामाचा आढावा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी-अणसुरे रस्त्याच्या कामाचा आढावा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत….

 

✍️राजू सागवेकर/राजापूर

 

▪️ राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ५ कोटी ५४ लाख रुपये मंजूर असलेल्या चव्हाणवाडी ते अणसुरे रस्त्याच्या कामाचा आढावा आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अणसुरे येथे घेण्यात आला.

 

▪️ या बैठकीत रस्त्याच्या कामासंबंधी ग्रामस्थ, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कामाच्या अडचणी समजून घेत आमदार सामंत यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

 

▪️ बैठकीस विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, गटविकास अधिकारी निलेश जगताप, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे श्री. माने, नायब तहसीलदार दीपाली पंडित, तालुकाप्रमुख दीपक नागले, सरपंच रामचंद्र कणेरी, प्रांजली गावकर, अजित नारकर, कनिष्ठ अभियंता सुनील धनावडे तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

▪️ रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर देत, ग्रामस्थांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी यावेळी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]