साठवली येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचा आढावा.

साठवली येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचा आढावा.

जितेंद्र चव्हाण – लांजा…

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील लांजा तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या सडवली ते लेवाडी-भंडारवाडी-साठवली बाजारपेठ रस्त्याच्या कामाचा आढावा आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत साठवली येथे घेण्यात आला.

या रस्त्यासाठी ३ कोटी ८६ लाख रुपये मंजूर असून, कामाच्या अंमलबजावणीसंदर्भात ग्रामस्थ, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांना व ठेकेदाराला येणाऱ्या अडचणी समजून घेत काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, सरपंच इरम बरमारे, सरपंच संघटना अध्यक्ष परेष खानविलकर, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे श्री. माने, कनिष्ठ अभियंता संकेत जाधव, हलीमबी मुकादम, दिलवर बरमारे, जलील मुकादम, अबीद काझी, इर्शाद बरमारे, ठेकेदार अण्णा भिंगार्डे तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार किरण सामंत यांनी रस्त्याच्या कामात गुणवत्तेचा दर्जा राखण्याच्या सूचना देत लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यावर भर दिला. स्थानिक ग्रामस्थांनीही या बैठकीत त्यांच्या अडचणी मांडल्या व सकारात्मक चर्चा झाली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें