कोंडगाव मुरलीधर आळी येथील अंगणवाडीमध्ये स्तनदा आणि गरोदर मातांसाठी देण्यात आलेल्या पोषक खाद्यपदार्थात अजब प्रकार…..?

कोंडगाव मुरलीधर आळी येथील अंगणवाडीमध्ये स्तनदा आणि गरोदर मातांसाठी देण्यात आलेल्या पोषक खाद्यपदार्थात अजब प्रकार…..?

साखरपा-(भरत माने )…..

कोंडगाव मुरलीधर आळी येथील अंगणवाडीमध्ये स्तनदा आणि गरोदर मातांसाठी देण्यात आलेल्या पोषक खाद्यपदार्थात अजब प्रकार…..? उंदीर सापडला

कोंडगाव मुरलीधर आळी येथील अंगणवाडीमध्ये स्तनदा आणि गरोदर मातांसाठी देण्यात आलेल्या पोषक खाद्यपदार्थात अजब प्रकार घडला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंगणवाडी कार्यक्रमांतर्गत स्तनदा आणि गरोदर महिलांना पोषण खाद्य वितरित केले जाते, परंतु या खाद्यात चक्क उंदीर मृत स्थितीत आढळला आहे. यामुळे कोंडगाव गावातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

कोंडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जोयशी यांनी या घटनेची पाहणी केली आणि यावर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला. त्यांनी तालुका गटविकास अधिकाऱ्यांना फोन करून या घटनेची तपासणी करण्यास सांगितले आणि त्यासोबतच जबाबदार एजन्सीवर कडक कार्यवाही करावी, असे कळवले. प्रियांका जोयशी यांनी सांगितले की, या घटनेचा संबंध गावातील नागरिकांच्या जीवनाशी असल्याने हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे आणि यावर कोणतीही दुर्लक्षिता केली जाऊ नये.

ग्रामपंचायत सरपंच यांनी याबाबत सांगितले की, प्रत्येक महिन्याला कोंडगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील 20-25 महिलांना पोषण खाद्य दिले जाते, परंतु यातील हे अयोग्य पदार्थ पथ्य म्हणून दिले जात असल्याने भविष्यात लहान मुलांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे बालकांना धोका होऊ शकतो, ज्यामुळे दुर्दैवी घटनांचा सामना करावा लागेल.

या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रियांका जोयशी यांनी ठरवले आहे की, शासन स्तरावर याबाबत कडक कारवाई केली जावी. प्रशासनाने योग्य ते चौकशी प्रक्रिया सुरू केली पाहिजे आणि यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कडक कार्यवाही केली जावी.

त्यामुळे, कोंडगाव ग्रामपंचायत आणि नागरिक यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंचांनी केली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें