तवसाळ पंचक्रोशीतील श्री महामाई सोनसाखळी देवी चा भव्य शिमगोत्सव उत्साहात सुरूवात.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 तवसाळ पंचक्रोशीतील श्री महामाई सोनसाखळी देवस्थानचा भव्य शिमगोत्सव उत्साहात सुरू!

गुहागर, ता. ४ मार्च २०२५: कोकणातील सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपणारा शिमगोत्सव हा उत्सव तवसाळ पंचक्रोशीमध्ये मोठ्या जल्लोषात सुरू झाला आहे. हा शिमगोत्सव केवळ एक सण नसून, ग्रामदेवता श्री महामाई सोनसाखळी देवी, रवळनाथ, त्रिमुखी सोमजाई यांच्या पालखीसह होणारा पारंपरिक आणि भव्य सोहळा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील आणि कोकणातील हजारो भाविक उपस्थित राहतात.

शिमगोत्सवाची भव्य सुरुवात….

कोकणात होळीचा सण शिमगोत्सव म्हणून ओळखला जातो. फाल्गुन पंचमीला पहिली होळी पेटवून या सणाचा प्रारंभ होतो. त्यानंतर देवी-देवतांचे भोवनीचे खेळे जोगवा घेऊन गावभेटीला निघतात. हा आगळा-वेगळा सोहळा कोकणी संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे.

शिमगोत्सवाच्या पंचक्रोशीत एकूण १२ होम, तर वाडीवाडीत ९ होम साजरे होतात. या पवित्र विधीनंतर श्री महामाई सोनसाखळी देवीची पालखी पारंपरिक रीतसर पूजा आणि विधींनंतर मोठ्या जल्लोषात मिरवली जाते.

शिमगा कोंकण
फोटो -सचिन Dj

शिमगोत्सवाचा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा:

यंदाचा शिमगोत्सव १३ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

१३ मार्च २०२५ (गुरुवार)

  • रात्री १०.३० वाजता देवीचा रूपा लागेल, यानंतर श्री महामाई सोनसाखळी देवीची पालखी मोठ्या जल्लोषात होमावर प्रस्थान ठेवेल.

१४ मार्च २०२५ (शुक्रवार)

  • सकाळी १०.३० वाजता मंदिर परिसरात जत्रा भरवली जाईल.
  • पालखी तवसाळ खुर्द गावात नेली जाईल, जिथे हळदी-कुंकू विधीचा सोहळा पहाटेपर्यंत चालणार आहे.

१५ मार्च २०२५ (शनिवार) – शिमगोत्सवाचा मुख्य दिवस

  • सकाळी ११.०० वाजता पालखी होमावर प्रस्थान ठेवेल, आणि १२.०० वाजता होम पेटवला जाईल.
  • हा क्षण विशेष महत्त्वाचा मानला जातो. या वेळी हजारो भाविक एकत्र येऊन देवीच्या पालखीला साक्षी मानतात.
  • शिमगोत्सवाच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे, पालखी समुद्रात नेऊन नारळ अर्पण केला जातो. फेरी बोटीमधून देवीची पालखी समुद्रात नेण्याचा हा सोहळा हजारो भाविकांसाठी एक अद्वितीय दृश्य असतो.
  • दुपारी २.०० वाजता पालखी सहाणेवर परत येईल, त्यानंतर ३.३० वाजता तवसाळ आगर येथे होमावर नेली जाईल.
  • संध्याकाळी पालखी तवसाळ गावी सहाणेवर विराजमान होईल.

या भव्य सोहळ्यानंतर तवसाळ ग्रामस्थ मंडळाचा पारंपरिक तमाशा होणार आहे, ज्यामध्ये विविध पारंपरिक लोककला सादर केल्या जातील.

भाविकांना आवाहन….

“श्री महामाई सोनसाखळी देवीच्या कृपाशीर्वादाने तवसाळ पंचक्रोशीचा पारंपरिक शिमगोत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जात आहे. सर्व भक्तगणांनी या सोहळ्यात सहभागी होऊन देवीच्या पालखीचे दर्शन घ्यावे व या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा.”

श्री महामाई सोनसाखळी देवस्थान ट्रस्ट, तवसाळ

     जय देवी महामाई! सोनसाखळी 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]