विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड निश्चित

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड निश्चित..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढील अडीच वर्षांसाठी विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली असून, काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर पाच वर्षांसाठी..

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत एकमताने भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढील अडीच वर्षांसाठी विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली असून, काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर पाच वर्षांसाठी दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर सहमती होण्याची शक्यता आहे.

 

या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

 

— (आपल्या विश्वासार्ह बातम्यांसाठी वाच

त रहा!…. रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र)

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें