शिवसेना पक्षाच्या संपर्क मंत्र्यांची नवी जबाबदारी जाहीर! मंत्री उदय सामंत आणि मंत्री योगेश कदम यांना महत्त्वाची जबाबदारी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना पक्षाच्या संपर्क मंत्र्यांची नवी जबाबदारी जाहीर! मंत्री उदय सामंत आणि मंत्री योगेश कदम यांना महत्त्वाची जबाबदारी.

मुंबई, ४ मार्च २०२५: शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. पक्ष वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या असून, महाराष्ट्रभर शिवसेनेचा विस्तार आणि जनसंपर्क मजबूत करण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे.

मंत्री उदय सामंत यांना मुंबई उपनगर, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

???????? सिंधुदुर्ग, पुणे व मुंबई उपनगर ची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांना, जालना संपर्क मंत्री म्हणून मंत्री योगेश कदम यांना….

शिवसेना पक्षाने आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी काही मंत्री महोदयांना संपर्क जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली आहे.

शिवसेना संपर्क मंत्रींची नियुक्ती:

  1. श्री. गुलाबराव पाटील – परभणी, बुलढाणा
  2. श्री. उदय सामंत – मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग
  3. श्री. शंभूराजे देसाई – सांगली, नगर
  4. श्री. संजय राठोड – नागपूर, चंद्रपूर, अमरावती
  5. श्री. दादाजी भुसे – धुळे, नंदुरबार
  6. श्री. प्रताप सरनाईक – पालघर, सोलापूर
  7. श्री. भरतशेठ गोगावले – हिंगोली, वाशीम
  8. श्री. संजय शिरसाट – बीड, नांदेड
  9. श्री. प्रकाश आबिटकर – अकोला, लातूर
  10. श्री. आशिष जैस्वाल – भंडारा, गोंदिया
  11. श्री. योगेश कदम – जालना

ही नियुक्ती शिवसेना पक्ष कार्यालयातून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी हे निर्णय घेतले गेले असून, संपर्क मंत्री त्यांच्या जबाबदारीच्या जिल्ह्यांमध्ये पक्ष वाढीच्या दृष्टीने नियोजन व कार्यवाही करतील.

शिवसेना नेतृत्वाच्या या नव्या नियुक्त्यांमुळे पक्षसंघटनेला बळ मिळेल, तसेच गट आणि जिल्हास्तरावर अधिक प्रभावीपणे पक्षकार्य करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]