वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये वनभोजन विविध उपक्रमाने साजरा

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये वनभोजन विविध उपक्रमाने साजरा

गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी येथे वनभोजन आयोजित करण्यात आले. त्यावेळी विविध स्पर्धा गीतगायन स्पर्धा प्रश्नमंजुषा उपक्रम आयोजित करण्यात आले .वनभोजनाला शाळेचे मुख्याध्यापक डॉ श्री मनोज पाटील सर ,अंजली मुद्दामवार मॅडम , धन्वंतरी मोरे मॅडम, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला मॅडम उपस्थित होत्या.

सर्व विद्यार्थी व पालक वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. शाळा व्यवस्थापन समिती ,माता पालक संघ ,शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्या उपस्थित होत्या. वनभोजन बनवायला शिल्पा कोळथरकर, सुरक्षारोहिलकर, रीना खडपकर, विद्या रोहिलकर, अर्चना रोहिलकर, संचिता पालशेतकर, दीपिका रोहिलकर, कार्तिकी दाभोळकर, प्रिया रोहिलकर, संध्या पालशेतकर, दिपाली वरवटकर, अंकिता कोळथरकर, देवयानी कोळथरकर, विजया पालशेतकर, मृदुला जांभारकर, विशाखा नाटेकर, सुवर्णा कोळथरकर यांनी मदत केली. विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळले. अंताक्षरी खेळल्या. विद्यार्थ्यांना कागदापासून नवनवीन गोष्टी तयार करून दाखवण्यात आल्या. सरते शेवटी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला. अशा रीतीने वनभोजनाची सांगता झाली. एक वेगळा अनुभव ,निसर्गाशी विद्यार्थी एकरूप झाले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें