गुहागर तालुक्यातील काताळे गावात श्रीभैरी,कालकी,चंडकी ग्रामदेवतेंचा शिमगोत्सव उत्साहात साजरा होणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुक्यातील काताळे गावात श्रीभैरी,कालकी,चंडकी ग्रामदेवतेंचा शिमगोत्सव उत्साहात साजरा होणार

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील काताळे गावातील श्रीभैरी, कालकी, चंडकी या ग्रामदेवतांचा सन २०२५ मधील शिमगोत्सव सालाबादप्रमाणे याहिवर्षी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून मुंबई आणि गावातील लहान, थोरांपासून महिला – पुरुषांच्या आनंदाला उधाण आले आहे.

 

कोकणात प्रत्येक गावागावातील ग्रामदेवताच्या पालख्या सजल्या असून संपूर्ण कोकण भक्तीमय आनंदीमय झाले आहे, यात गुहागर तालुक्यातील काताळे गावातील ग्रामदेवता श्रीभैरी,कालकी,चंडकी या ग्रामदेवतेंच्या शिमगोत्सवाला आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण १० दिवसाचा कार्यक्रम श्रीभैरी, कालकी, चंडकी ग्रामदेवता ट्रस्ट काताळे व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला असून सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गणेश अरुण कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

आज मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वा. श्रीभैरी,कालकी,चंडकी ग्रामदेवतेंच्या देवळात देवाची रुपे लावणे म्हणजेच पालखी सजविणे हा कार्यक्रम गावकरी,मानकरी,वाडीप्रमूख ग्रामस्थ यांचे उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

 

बुधवार दिनांक १२ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ वाजता त्रयोदशीचा पहिला होम लागेल त्यानंतर पालखी सहाणेवर स्थानापन्न होईल.

 

गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ पालखी सहाणेवरुन निघेल व १० वाजता कोंडाचा भैरी देव येथे पौर्णिमेचा होम लावून पालखी पुन्हा सहाणेवर स्थानापन्न होईल.

 

शुक्रवार दिनांक १४ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजता पालखी सहाणेवरुन निघेल व सकाळी १० वाजता सोमनाथ मंदिर येथे धुळीवंदनाचा होम लावून पालखी हळदीकुंकू समारंभासाठी गावचे खोत श्री.अरुण कदम यांच्या निवासस्थानी जाईल हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पालखी सहाणेवर स्थानापन्न होईल.

 

शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता दिवाकरवाडीचे ग्रामस्थ यांच्या पुजेला सुरुवात होईल.

 

रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता कदमवाडीचे ग्रामस्थ यांच्या पुजेला सुरुवात होईल.

 

सोमवार दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजता मावळतवाडीचे ग्रामस्थ यांच्या पुजेला सुरुवात होईल.

 

मंगळवार दिनांक १८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नवानगर,लोहारवाडी,

तेलीवाडीतील ग्रामस्थ यांच्या पुजेला सुरुवात होईल.

 

बुधवार दिनांक १९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ठिक ४ श्री. सत्यनारायणाच्या महापुजेला सुरुवात होईल सायंकाळी ७ वाजता महाआरती होऊन रात्री ८ वाजता प्रासादिक भजन त्यानंतर रात्री १० वाजता बहुरंगी बहूढंगी नमनाचा कार्यक्रम संपन्न होईल.

 

गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता पालखी सहाणेवरुन निघेल व भराड्यावर स्थानापन्न होईल नैवद्य झाल्यावर पालखी भराड्यावरुन वाजतगाजत देवळात जाईल त्यानंतर देवाची रुपे उतरवून शिमगोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.

गुहागर तालुक्यातील काताळे गावात श्रीभैरी,कालकी,चंडकी ग्रामदेवतेंचा शिमगोत्सव उत्साहात साजरा होणार

या संपूर्ण शिमगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन श्रीभैरी,कालकी,चंडकी ग्रामदेवता ट्रस्ट काताळे व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश अरुण कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]