शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते – दहिवली येथे जागतिक महीला दिन उत्साहात साजरा.

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते – दहिवली येथे जागतिक महीला दिन उत्साहात साजरा.

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते – दहिवली येथे जागतिक महीला दिन उत्साहात साजरा.

आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते – दहिवली येथे जागतिक महीला दिन उत्साहात संपन्न झाला. नारी शक्तिचा सन्मान हेच सशक्त व समृद्ध समाजाचे लक्षण आहे हाच हेतु समोर ठेवुन महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.महीलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व समाजातील त्यांचे आर्थिक स्थान उंचाविण्यासाठी नामांकित आर्थिक सल्लागार प्रतिमा शेलार यांचे वित्तीय व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या व्याख्यानातुन प्रतिमा शेलार यांनी उपस्थित महीलांना बचत , गुंतवणुक, वित्तीय नियोजन याचे महत्त्व पटवून दिले.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी उपस्थित महीला कर्मचारी वर्गाना संबोधित केले.नारी शक्ती चा सन्मान करणे व त्यांना समाजामध्ये सुरक्षीत स्थान निर्माण करुन देणे अत्यंत आवश्यक आहे.कारण स्त्री हीच एक उज्वल पिढी घडवु शकते असे प्रतिपादन केले. या वेळेस सर्व महीलांचा डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.या वेळी महाविद्यालयाचे कृषि विभाग प्रमुख डाॅ.हरिश्चंद्र भागडे,उद्यान विद्या विभाग प्रमुख प्रा.स्मिता जाधव, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख आश्विनी जाधव, सर्व प्राध्यापिका व महीला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें