गुहागर येथे मोफत कॅन्सर, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर येथे मोफत कॅन्सर, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन

आबलोली, गुहागर (प्रतिनिधी)

गुहागर पंचायत समिती, प्रकृति फाऊंडेशन आणि लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ मार्च २०२५ रोजी मोफत कॅन्सर, आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर पागडेवाडी सभागृह, आबलोली येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराचा ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

शिबिरात महिला व पुरुषांची कॅन्सर तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी करण्यात आली. आबलोली तसेच परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

आरोग्य तपासणीचे महत्त्व – बीडीओ शेखर भिलारे

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बीडीओ मा. श्री. शेखर भिलारे यांनी उत्तम आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. “लवकर निदान झाल्यास उपचार यशस्वी होऊन आयुष्य वाढण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी प्रकृति फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच सौ. वैष्णवी नेटके, प्रकृति फाउंडेशनच्या संस्थापिका मिलन जंगम, अध्यक्ष देवेंद्र जंगम, डॉ. ऋतुजा गंगावणे, डॉ. प्राची दिलवाले, डॉ. स्वरदा जाधव, श्री. अभिजित सुर्वे, श्री. वैभव जोशी, ॲड. प्रमेय आर्यमाने, सचिन कारेकर, श्री. सूर्यवंशी तसेच सर्व आशा वर्कर यांनी मोलाची भूमिका बजावली.

संयुक्त प्रयत्नातून आरोग्यदायी उपक्रम

या शिबिराचे आयोजन बीडीओ शेखर भिलारे, ग्रामपंचायत आबलोली, सरपंच सौ. नेटके, ग्रामपंचायत सदस्य, ॲड. प्रमेय आर्यमाने, ग्रामस्थ, अध्यक्ष पागडेवाडी, डॉ. ऋतुजा गंगावणे आणि प्रकृति फाउंडेशन यांच्या अथक प्रयत्नातून करण्यात आले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांचे अधिकाधिक आयोजन करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]