मच्छिमारांना दिलासा : राज्यातील ७,७९६ यांत्रिकी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर

मच्छिमारांना दिलासा : राज्यातील ७,७९६ यांत्रिकी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर

मुंबई : राज्यातील सागरी जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या मच्छिमार सहकारी संस्थांच्या यांत्रिकी मासेमारी नौकांसाठी सन २०२५-२६ या कालावधीकरिता मार्च महिन्यासाठी डिझेल कोटा मंजूर करण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १३८ मच्छिमार सहकारी संस्थांच्या ७,७९६ यांत्रिकी नौकांसाठी १,६८,१०९ कि.ली. इतका डिझेल कोटा मंजूर करण्यात आला आहे.

हा कोटा मंजूर करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने रिअर क्राफ्ट ऑनलाईन प्रणालीद्वारे नौका नोंदणी प्रमाणपत्र घेतलेल्या तसेच विधीग्राह्य मासेमारी परवाना असलेल्या नौकांचाच विचार केला आहे. महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

गस्ती नौका आणि ड्रोन सर्वेक्षणाद्वारे दोषी आढळलेल्या नौकांचे मासेमारी परवाने रद्द करण्यात आले असून, अशा नौकांना डिझेल कोटा देण्यात आलेला नाही. तसेच नियमभंग करणाऱ्या नौकांचे निलंबन करण्यात आल्याचेही मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें