आमदार किरणजी सामंत यांची शाश्वत कोकण परिषदेच्या सदस्यांशी मुंबईत चर्चा

आमदार किरणजी सामंत यांची शाश्वत कोकण परिषदेच्या सदस्यांशी मुंबईत चर्चा

संदीप शेमणकर यांचकडून

मुंबई – ३ एप्रिल २०२५ रोजी राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरणजी उर्फ भैय्या सामंत यांची शाश्वत कोकण परिषदेच्या सदस्यांनी मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत कोकणातील पर्यावरणपूरक उद्योगांच्या संधी आणि प्रदूषणकारी प्रकल्पांविरोधातील स्थानिकांचा विरोध यासंदर्भात चर्चा झाली.

 

परिषद सदस्यांनी कोकणात रिफायनरीसारखे पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प होऊ नयेत, अशी कोकणवासीयांची भावना आमदार सामंत यांच्यापर्यंत पोहोचवली. तसेच, राजापूर मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामपंचायत पातळीवरील आराखडे तसेच पर्यटन विकास आराखड्यांसाठी परिषदेचे सहकार्य राहील, असे सांगण्यात आले.

 

या चर्चेस शाश्वत कोकण परिषदेचे निमंत्रक सत्यजित चव्हाण, बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर, देवाचे गोठणे येथील गोपीनाथ घाडी आणि योगेश चव्हाण, पन्हळे (धोपेश्वर) येथील महेंद्र गुरव, स्वप्नील सोगम, दीपेश सोगम, सोलगावचे चंद्रकांत सोडये आणि कळणे (सिंधुदुर्ग) येथील रणजित देसाई उपस्थित होते.

 

 

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें