भाजप महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत?

 भाजप महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत?

???? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांच्या रणनीतीचा आढावा

 

मुंबई: विधानसभा निवडणुकीत यश मिळवणाऱ्या महायुतीत लवकरच ताणतणाव दिसण्याची चिन्हं आहेत. कारण भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘स्वबळ’ आजमवण्याची तयारी सुरु केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात भाजपच्या स्थानिक निवडणूक तयारीचा आढावा घेतला असून मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या महत्त्वाच्या महानगरांमध्ये पक्षाची ताकद आणि संधी याचा अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

 

मुंबईत शहा यांच्या भेटीस गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेतील १०७ जागांची मागणी केली असल्याची माहिती आहे. मात्र, शहा यांनी यावर कोणताही स्पष्ट शब्द न देता स्वबळाची शक्यता तपासण्यावर भर दिला. त्यामुळे भाजपने आता स्वतंत्र रणनिती आखण्याची सुरुवात केल्याचं दिसतं.

 

२०१७ मधील निवडणुकीत शिवसेनेने ८४ व भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. आता शिवसेना दोन गटांमध्ये विभागली आहे, तर भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे मुंबईत पहिल्यांदाच भाजप महापौर बसवण्याचा पक्षाचा मनसुबा आहे.

 

त्याचबरोबर, शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेलं ठाणे आणि अजित पवारांचा प्रभाव असलेलं पुणे या दोन्ही ठिकाणी भाजप स्वतंत्र लढतीचा विचार करत आहे. ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांच्यावर जबाबदारी दिली आहे. भाजपची ही ‘शत-प्रतिशत’ रणनीती मित्रपक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

 

 

 

#भाजप #महापालिका #अमितशहा #मुंबईमहापालिका #स्वबळ #शिवसेना #महायुती #राजकारण #राज्यराजकारण #RatnagiriVartahar

 

???? फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें