भातगाव सुवरे वाडी येथील कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिची पोलीस शिपाई पदी नियुक्ती – सुयश कॉम्प्युटर सेंटरने केला गौरव

भातगाव सुवरे वाडी येथील कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिची पोलीस शिपाई पदी नियुक्ती – सुयश कॉम्प्युटर सेंटरने केला गौरव

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील अतिशय ग्रामीण आणि डोंगराळ भागातील भातगाव सुवरे वाडी येथील गरीब कुटुंबातील कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिची रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती सन २०२२ – २३ च्या पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई पदी नियुक्ती झाली असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संचालिका सौ. सावी संदेश साळवी यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिचा सत्कार करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी,पत्रकार संदेश कदम, मिरजोळे – रत्नागिरी येथील हवालदार दत्तात्रय किर,चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोलीचे शिक्षक सिताराम व्हनमाने, संदिप महाडिक, शुभम सावंत आदी. उपस्थित होते

सत्काराला उत्तर देताना कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिने असे सांगितले की. मी कब्बडी पट्टू खेळाडू आहे माझे शिक्षण १० वी पर्यंत मांजरे हायस्कूल येथे झाले. आणि ११ वी, १२ वी जाकादेवी कॉलेज येथे झाले असून मी आता बी. ए. च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. माझी परिस्थिती गरिबीची असली तरी काही तरी करण्याची जिद्द आणि आई वडिलांचे व समाजाचे नाव उच्च स्थानी नेणार आहे .यामध्ये मला मिरजोळी – रत्नागिरी येथील हवालदार दत्तात्रय कीर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे असे कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिने आवर्जून सांगितले.

 

* भातगाव सुवरे वाडीच्या प्रणाली सुवरे हिची पोलीस शिपाई पदी नियुक्ती

ग्रामीण भागातून पोलीस दलात: Pranali Suvare’s Inspiring Journey

 

 

 

Hashtags

* #PranaliSuvare

* #PoliceAppointment

* #RatnagiriPolice

* #Guhagar

* #SuyashComputerCenter

* #SuccessStory

* #InspiringJourney

* #MaharashtraPolice

* #पोलीसभरती

* #प्रणालीसुवरे

* #रत्नागिरी

* #गुहागर

* #महिलाशक्ती

* #RuralSuccess

* #KabaddiPlayer

* #DreamComeTrue

* #DattatrayKirGuidance

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें