भारत-अमेरिका व्यापार करार चर्चेत खंड; ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

भारत-अमेरिका व्यापार करार चर्चेत खंड; ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादले

 

27 ऑगस्टपासून टॅरिफ लागू; अमेरिकेचं शिष्टमंडळ भारत दौरा रद्द, नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

 

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावग्रस्त झाले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात 25 ते 29 ऑगस्टदरम्यान व्यापार करारावर चर्चा होणार होती. मात्र अमेरिकेचं शिष्टमंडळ नियोजित बैठकीसाठी भारतात न आल्याने या चर्चेला स्थगिती मिळाली आहे. शिष्टमंडळाकडून लवकरच नवी तारीख निश्चित केली जाईल, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे.

 

आत्तापर्यंत भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत पाच वेळा चर्चा झालेली असून सहाव्या फेरीसाठी अमेरिकेचे प्रतिनिधीमंडळ भारतात येणे अपेक्षित होते. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले की, द्वीपक्षीय व्यापार कराराबाबत चर्चा सुरु आहे आणि दोन्ही देशांनी 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले आहे.

 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार 27 ऑगस्टपासून भारतावर 50% टॅरिफ लागू होणार आहे. भारत सरकारने हा निर्णय अन्यायकारक, अयोग्य आणि चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

 

व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर आयात करत असल्याचा उल्लेख केला आणि दुय्यम टॅरिफ लागू झाल्यास भारतासह चीनसाठी ते विनाशकारी ठरेल, असेही ते म्हणाले.

 

 

 

हॅशटॅग

#भारतअमेरिका #TradeDeal #DonaldTrump #TariffWar #USIndiaRelations #व्यापारकरार #BreakingNews #अमेरिका #IndiaUS #TrumpTariff

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]