“हा भारताच्या संविधानाचा अपमान!” – राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर

“हा भारताच्या संविधानाचा अपमान!” – राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे स्पष्टीकरण; “सर्व पक्ष आमच्यासाठी समान, खोट्या आरोपांना आम्ही घाबरत नाही

नवी दिल्ली – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदान प्रक्रियेत घोळ व मतचोरी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली होती. मात्र, आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे. निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष समान आहेत. आम्ही राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही. मतचोरीसारखे शब्द वापरणं म्हणजे जनतेची दिशाभूल करणं आहे.”

ज्ञानेश कुमार पुढे म्हणाले की, मतदान प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी एसआयआर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सर्व पक्षांनी पुढील १५ दिवसांत त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात. बिहारमधील सात कोटींपेक्षा जास्त मतदार निवडणूक आयोगाच्या पाठीशी उभे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच, “निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केल्यानंतर कायद्यानुसार ४५ दिवसांच्या आत राजकीय पक्ष सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. मात्र, हा कालावधी संपल्यानंतर अशा प्रकारचे निराधार आरोप करणं योग्य नाही. आम्ही खोट्या आरोपांना घाबरत नाही. गरीब, श्रीमंत, महिला आणि तरुण – सर्व मतदारांसोबत निवडणूक आयोग दगडासारखा उभा आहे.” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना आधार नसल्याचं सांगत आयोगाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असून “जनतेला संभ्रमात टाकण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे,” असा इशाराही दिला.

 


हॅशटॅग :

#ElectionCommission #RahulGandhi #LokSabha #मतदानप्रक्रिया #Constitution #IndiaPolitics

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें