साटवली गावात मोकाट जनावरे; अपघातांचा धोका वाढला, ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🚨 साटवली गावात मोकाट जनावरे; अपघातांचा धोका वाढला, ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष

 

ग्रामस्थांची तीव्र नाराजी; शासनाने दंड वाढवला तरीही कारवाई शून्य

लांजा प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण –

लांजा तालुक्यातील साटवली या गावात मोकाट गुरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून रस्त्याच्या मधोमध गुरे बसल्याने वाहनधारक आणि पादचार्‍यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सदर ठिकाण हे तीव्र उतार व वळणाचा असल्याने अचानक गुरे आडवी आली तर अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

 

ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामसभेमध्ये सूचना देऊनही ग्रामपंचायतीकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक पोलीस पाटील सदानंद किल्लेकर यांनी संबंधित गुरामालकांना सूचना दिल्या असल्या तरी त्यांनी दुर्लक्ष केल्याचे समजते.

 

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये लागू केलेल्या ग्रामपंचायत सुधारणा विधेयकानुसार मोकाट जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्यांवर ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच जनावरांना इअर टॅगिंग अनिवार्य केले असून टॅग नसलेली जनावरे पकडून गोशाळेत पाठवण्याचा निर्णय आहे. नगरपालिका किंवा महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तातडीची कारवाई करू शकतात.

 

👉 शासनाने नियम कठोर केले असले तरी साटवली गावात प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांनी संबंधित गुरामालकांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

 

 

 

📌 हॅशटॅग्स:

 

#लांजा #साटवली #मोकाटजनावरे #ग्रामपंचायत #रस्तेअपघात #रत्नागिरीवार्ताहर

 

 

 

📷

 

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]