वादळग्रस्त करबुडे गावाला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट; नुकसानीचा घेतला आढावा

 

वादळग्रस्त करबुडे गावाला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट; नुकसानीचा घेतला आढावा

 

वादळग्रस्त नागरिकांच्या पाठीशी सरकार ठाम – सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

 

रत्नागिरी :

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी आज (गुरुवार) पहाटेच रत्नागिरी दौऱ्यादरम्यान करबुडे गावातील वादळग्रस्त भागाची पाहणी केली. सकाळी सुमारे सात वाजता झालेल्या या पाहणीवेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत वादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली.

 

यावेळी बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, “वादळग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील,” असे आश्वासन त्यांनी दिले.

 

या पाहणीवेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, गावकर तांबे, प्रविण पांचाळ, सरपंच संस्कृती पाचकुडे, शंकर सोनवडकर, मंगेश सोनवडकर, वैभव कळंबटे, मिलिंद खानविलकर, सचिन पाचकुडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

🔖 हॅशटॅग्स :

 

#उदयसामंत #रत्नागिरी #वादळग्रस्त #करबुडेगाव #RatnagiriNews #UdaySamant #RatnagiriVartahar #KonkanNew

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें