अंबरग्रीस विषयी संशोधन आणि लोकाभिमुख धोरण आवश्यक: डॉ केतन चौधरी 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंबरग्रीस विषयी संशोधन आणि लोकाभिमुख धोरण आवश्यक: डॉ केतन चौधरी 

 

रत्नागिरी -दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी या केंद्राचा वर्धापनदिन निमित्त “अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचार मंथन” (Brain-storming on Ambergris) ही कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या केंद्राला भेट देणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांनी “अंबरग्रीस विषयावरील विचार मंथन” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्याकरिता इच्छा व्यक्त केली होती. म्हणूनच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी च्या स्थापना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या आर्थिक सहाय्याने “अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचार मंथन” या विषयावर एकदिवशीय विचारमंथन सभा आयोजीत करण्यात आली. या विचार मंथन सभेमध्ये सुमारे ४० शास्त्रज्ञ, मत्स्य व्यावसायिक, वन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, युनडीपी प्रकल्पाचे अधिकारी, मान्यवर संस्थाचे अधिकारी सहभागी झाले होते.

स्पर्म व्हेलच्या उलटीला अंबरग्रीस असे म्हटले जाते. व्हेल (जलचर प्राणी) संरक्षित असल्याने त्याची उलटी सुद्धा भारतात “संरक्षित” मानली जाते. व्यावसायिक बाजारपेठेत या अंबरग्रीसला मोठी किंमत आहे, असे कळते. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत अंबरग्रीस “संरक्षित” असली तरी इंग्लंड, न्यूझीलंड, फ्रांस इत्यादी देशामध्ये व्हेल “संरक्षित” असला तरी अंबर ग्रीस “संरक्षित” नाही. कोकण किना-यावर अंबरग्रीस आढळून येण्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे, संशोधनाचे मुद्दे कोणते असावे, तसेच लोकाभिमुखी धोरण कसे असावे याविषयी विचार मंथन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे डॉ. केतन चौधरी (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रमुख, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी) यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून तसेच, राज्यगीत, कोंकण कृषी विद्यापीठ गीत आणि वंदे मातरम गायनाने करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉ. हरीश धमगये, अभिरक्षक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली, तर डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचा ईतिहास आणि कार्याची माहिती दिली. मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री. जे.दि. सावंत आणि सृष्ठी कन्झर्वेशन फाउंडेशन, रत्नागिरी आणि आसमंत फाउंडेशन, रत्नागिरीचे प्रतिनिधी डॉ. विशाल भावे यांनी मार्गदर्शन भाषणे केलीत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिल पावसे, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी यांनी या कार्यक्रमातून मत्स्यव्यावसायिक आणि वरील लोकांमध्ये या किनारपट्टीकार्यक्रमातून अंबरग्रीस बाबत नक्कीच जनजागृती निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली. श्री. किरण ठाकूर, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, रत्नागिरी यांनी अंबरग्रीस बाबत भीती न बाळगता, सापडल्यास १९२६ या हेल्प लाईन नंबर वर किंवा ‘जलचर’ या मोबाईल ॲप वर कळविण्याचे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांनी अंबरग्रीस बाबत कायद्याची भीती न राहता, अंमलबजावणी होण्याकरिता जनजागृती होणे गरजेचे आहे अशी आशा व्यक्त केली. त्याकरिता ज्याला अंबरग्रीस मिळेल त्याला बक्षीस रुपात शासनाकडून काही तरी मोबदला मिळाला तर कायद्याची भीती न राहता, कायद्याची उत्तम अंमलबजावणी होईल अशी आशा व्यक्त केली.

तांत्रिक सत्रामध्ये डॉ. अजय नाखवा, सी.एम.एफ.आर.आय., मुंबई विभाग, यांनी ‘भारतातील सागरी सस्तन प्राण्यांच्या साठ्याचे मुल्यांकन’ यावर ऑनलाईन प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. प्रा. नरेंद्र चोगले यांनी अंबर ग्रीस बाबत माहिती आणि नवीन प्रस्तावित संशोधन याबाबत माहिती दिली. श्री. किरण ठाकूर यांनी ‘वाईल्डलाईफ प्रोटेक्षण अॅक्ट, १९७२ मधील अंबर ग्रीस संबंधी नोंदी आणि कायदेविषयक स्थिती’ याबाबत मार्गदर्शन केले. श्री. महेंद्र पराडकर, पत्रकार, यांनी ‘अंबर ग्रीस बाबत स्व-अनुभव आणि पत्रकारांची भूमिका’ मांडली. प्रा. सचिन साटम यांनी अंबर ग्रीस: संशोधन आढावा याबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले. यानंतर ‘अंबर ग्रीस: पर्यावरण पूरक लोकोपयोगी शासन भूमिका’ यावर खुली चर्चा करण्यात आली यावेळी सर्व सहभागीनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शेवटी सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. विचारमंथन सभा आसमंत फाउंडेशन यांच्या आर्थिक सहाय्याने आयोजित करण्यात आली.

सदर कार्यक्रम यशस्वी तेकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आसिफ पागारकर, प्राध्यापक; डॉ. हरिष धमगये, अभिरक्षक व प्राध्यापक; प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी; श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, श्रीम. ए. एन. सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाकरिता श्री. रमेश सावर्डेकर, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक; कार्यालय अधिक्षक, श्री. श्रीकांत तांबे, श्री. मनिश शिंदे, मत्स्यालय यांत्रिक; श्रीम. जे. जे. साळवी, वरिष्ठ लिपिक; श्री. सचिन पावसकर, लिपिक; श्री. दिनेश कुबल, बोटमन; श्री. सुहास कांबळे व श्री. राजेंद्र कडव, शिपाई, श्री. सचिन चव्हाण, मजूर, श्री. प्रवीण गायकवाड, क्षेत्र संग्राहक; श्री. तेजस जोशी, श्री. प्रशांत पिलणकर, श्री. योगेश पिलणकर, श्री. स्वप्नील आलीम, श्री. अभिजित मयेकर, श्री. केतन चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]