सहकार चळवळी मुळे महाराष्ट्र समृद्ध – साहेबराव खामकर 

सहकार चळवळी मुळे महाराष्ट्र समृद्ध – साहेबराव खामकर 

नंदकुमार बगाडे पाटील. अहिल्या नगर 

श्रीगोंदा : सहकारा मुळे महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण भागात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास झाला असून जनसामान्यांची प्रगती झाली आहे , असे विचार सहकार भारतीचे स्थापना दिनानिमित्त पुणे येथे आयोजित कार्यक्रमात सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशचे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांनी व्यक्त केले.दिनांक ११ जानेवारी हा सहकार भारतीचा स्थापना दिन असून संपूर्ण देशपातळीवर ही संस्था कार्यरत असून सहकारा मुळे महाराष्ट्र समृद्ध झाला असून सहकारातील काही दोष निवारण्याचे दृष्टीने सहकार भारतीचे जे ब्रीद वाक्य आहे बिना संस्कार, नही सहकार हे रुजविण्याची अत्यंत गरज आहे असे ते पुढे म्हणाले.या वेळी बोलतांना रावळगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी सांगितले की सहकार क्षेत्रातील सर्व उद्योग हे व्यावसायिक पध्दतीने चावविले पाहिजेत तसेच विशेषतः साखर उद्योगावरील काही नियंत्रणात सरकारकडून

शिथिलता आणली पाहिजे.

कार्यक्रमाचे सुरूवातीला पुणे महानगर साखर कारखाना प्रकोष्ठ समन्वयक बाळ भिंगारकर यांनी प्रास्ताविकात सहकार भारतीचे कार्याचा आढावा घेतला.वाय.जी.पवार यांनी आपल्या मनोगता मध्ये सहकारा मुळे ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे संसाराला हातभार लागला , असे मत व्यक्त केले. केंद्र सरकारचे धर्तीवर राज्य सरकार नवीन सहकार धोरण आणणार असून या समिती मध्ये सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री विवेक जुगादे यांचा समावेश झाल्याबद्दल खामकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी आबासाहेब शिंगोटे , शहाजीराव बोरूडे , नवदीप सोशल फाउंडेशनचे सचिव प्रताप खामकर, प्रा.गहिनीनाथ हुमे ,

रविंद्र साळुंके आदी उपस्थित होते.पुणे जिल्हा पतसंस्था प्रकोष्ठ सहप्रमुख विनोद अष्टुल यांनी आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें