वेळणेश्वर जि. प. गटात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना आमने-सामने लढत

वेळणेश्वर जि. प. गटात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना आमने-सामने लढत

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यात महत्त्वाची लढत ही वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात होणार असून ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना अशी रंगतदार लढत होणार असून ठाकरे सेनेच्या तरुण, तडफदार, उच्चशिक्षित उमेदवार सिद्धी संतोष रामगडे विरुद्ध माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकूर यांच्यामध्ये समोरा – समोर लढत होणार असून सिद्धी संतोष रामगडे यांना विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव यांचा जबरदस्त पाठिंबा असून आमदार भास्करशेठ जाधव यांनीच सिद्धी रामगडे यांना वेळणेश्वर गटातून नेत्रा ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात लढण्यासाठी उमेदवारी दिली आहे. तर माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा नवनीत ठाकूर यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी उमेदवारी दिली आहे. ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना असे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते जिल्हा परिषद वेळणेश्वर गटात आक्रमक प्रचार यंत्रणा राबवत असून आपापला विजय निश्चित करीत आहेत. नक्की विजय कोणाचा होतो. हे मतदार ठरवतील आणि त्याचा निर्णय हा दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी ते चित्र स्पष्ट होईलच. या निवडणुकीच्या निकालाकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें