लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

highlits

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

रत्नागिरी :- निलेश रहाटे

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट २०२४ शासन आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून zp शाळा मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे वाटद मिरवणे ग्रामपंचायत मधून बसवण्यात आले होते . मात्र, या कॅमेऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
तालुक्यातील रायवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत शाळेकडून ग्रामपंचायत प्रशासनाला सुमारे सहा महिन्यांपूर्वी लेखी स्वरूपात कळविण्यात आले होते. तरीदेखील आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती अथवा कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही.

शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही यंत्रणा निष्क्रिय झाल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून वेळेत देखभाल न केल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची टीकाही होत आहे.

या प्रकरणी रत्नागिरी वार्ताहर प्रतिनिधी व RTI कार्यकर्ता निलेश रहाटे यांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले असून, तात्काळ दुरुस्ती करून जबाबदारी निश्चित करून cctv पूर्वता चालू करावेत. तसेच, याकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील स्तरावर तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ह्या बाबत प्रतिनिधी निलेश रहाटे नी वाटद मिरवणे ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामसेवक ला संपर्क केला असता कुठचा ही प्रतिसाद मिळाला नाही.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें