डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानातून संविधानाची निर्मिती – अफसाना मुल्ला

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानातून संविधानाची निर्मिती -अफसाना मुल्ला 

गुहागर

विविध देशातील राज्यघटनांचा अभ्यास करून २ वर्षे ११ महिने १८ दिवस इतक्या कालावधीत भारताला संविधानाची निर्मिती करण्यात आली, स्वातंत्र्य समता बंधुता असे हक्क आपणाला मिळाले ,देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांनी स्त्रिया व शोषित समाजासाठी कायदे केले, संविधानापेक्षा काहीच मोठे नाही, भारतातील राज्यघटना ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये संपन्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून अफसाना मुल्ला यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निलेश पाटील यांनी केले .त्यांनी डॉ आंबेडकरांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली .मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील म्हणाले की , विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातून स्फूर्ती घ्यावी.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले व संपूर्ण आयुष्य बांधवांसाठी व्यतीत केले, अत्यंत मेहनतीने व अभ्यासपूर्ण रीतीने राष्ट्राला संविधान अर्पण केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड मॅडम यांनी केले .त्यावेळी अनिश पालशेतकर, आरोही रोहीलकर ,अन्वीजांभारकर, सानवी रोहीलकर ,साई नाईक, धन्वंतरी मोरे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.त्यावेळी डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें