राजापूर तालुक्यात ठराविक डॉक्टरांकडून वैद्यकीय चिट्ठीबाबत (प्रिस्क्रिप्शन) कायद्याचे उल्लंघन

*राजापूर तालुक्यात ठराविक डॉक्टरांकडून वैद्यकीय चिट्ठीबाबत (प्रिस्क्रिप्शन) कायद्याचे उल्लंघन*

*नॅशनल मेडिकल कॉन्सिल (NMC) आणि ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स कायदाचे नियम ठराविक डॉक्टरांकडून पायदळी*

*समिर शिरवडकर- रत्नागिरी*

राजापूर:- तालुक्यातील ठराविक डॉक्टरांच्या स्वतःचा क्लिकिन मधील मेडिसिन विक्री बाबतचा काळा बाजार यापूर्वी दैनिक चालु वार्ता विषय सातत्याने लाऊन धरला असता,यात अजून एक नवीन भर पडली असून यात ठराविक डॉक्टरांकडून वैद्यकीय चिट्ठीबाबत (प्रिस्क्रप्शन) कायद्याने उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. नॅशनल मेडिकल कॉन्सिल NMC आणि औषध आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियम दिलेल्या अटी शर्ती पायदळी ठराविक डॉक्टरांकडून तुडवल्या जात असल्याचे दिसून आले आहे,तशी तक्रार औषध प्रशासन रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
नॅशनल मेडिकल कॉन्सिल NMC आणि औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार रुग्णांची आणि डॉक्टरांची अचूक माहिती देणे बंधनकारक आहे.यात डॉक्टरांचां तपशील,पूर्ण नाव,पदवी, नोंदणी क्रमांक, पत्ता आणि संपर्क,तसेच सही शिक्का. त्याचप्रमाणे रुग्णाचे नाव,वय,तारीख, वेळ,रोगाचे निदान इत्यादी..तसेच औषध बाबत स्पष्ट अक्षर, जेनरिक औषधे, शेड्युल ड्रग्स ,आणि स्वाक्षरी असणे कायद्यानुसार बंधनकारक असताना फक्त गोळ्याची नावे देऊन कायदाचे उल्लंघन होत आहे.यावर औषध प्रशासन रत्नागिरी कोणती कारवाई करणार याकडे समस्त राजापूर वासियांचे लक्ष लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें