आंबोळगडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा रणशिंग फुंकले! आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणनीती आखली; संघटनात्मक नियुक्त्याही जाहीर

आंबोळगडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा रणशिंग फुंकले! आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणनीती आखली; संघटनात्मक नियुक्त्याही जाहीर

 

मुंबई – संदीप शेमणकर

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबोळगडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पक्षाच्या वतीने आयोजित आंबोळगड गावच्या सर्वसाधारण सभेत आगामी निवडणुकीची रणनीती, गावातील विविध विकासकामांचा आढावा आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध संघटनात्मक पदांवरील नियुक्त्या जाहीर करून गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला वेग

या सभेला माजी आमदार गणपत (दादा) कदम, रत्नागिरी महिला उपजिल्हा संघटिका सौ. उल्काताई विश्वासराव, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिलजी भोवड, सहसंपर्कप्रमुख नामदेवजी नार्वेकर, महिला सहसंपर्कप्रमुख सौ. प्राची पवार, देवाचे गोठणे विभाग संपर्कप्रमुख तुळशीदास नवाळे, विभागप्रमुख नरेशजी शेलार, उपविभाग संपर्कप्रमुख मधुकरजी मांडवकर, नाटे पंचायत गण उपविभाग संपर्कप्रमुख सुरेंद्र करंगुटकर, तसेच सोशल मीडिया पदाधिकारी प्रकाश चव्हाण आणि संतोष जोगळे उपस्थित होते.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गावातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक ताकद आणि पुढील काळातील नियोजन यावर चर्चा करण्यात आली. आंबोळगडमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.

गाव आणि वाडी पातळीवर संघटनात्मक बांधणी

पक्षाची ताकद गावागावांत आणि वाडी-वस्त्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुंबईतून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोळगडमध्ये गाव संघटक, वाडी संघटक, शाखाप्रमुख, गटप्रमुख आणि महिला पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

यामध्ये आंबोळगड बुथ संपर्कप्रमुख रामदास मयेकर, बुथ समन्वयक दयानंद करंगुटकर, शाखाप्रमुख राजन मयेकर, महिला शाखा संघटिका शुभांगी तावडे, सोशल मीडिया पदाधिकारी रविकांत करंगुटकर, प्रभाग क्रमांक १ चे गाव संघटक शंकर पारकर आणि प्रभाग क्रमांक २ चे गाव संघटक राजेंद्र लाड यांचा समावेश आहे.

गटप्रमुख म्हणून विकास करंगुटकर, राजेंद्र पारकर आणि दिलीप दुरगवळी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. वाडी सहसंघटक म्हणून परेश पांगले, जयदास करंगुटकर, सहदेव मयेकर आणि मंगेश पारकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

ज्येष्ठ आणि युवा शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग

या सभेला ज्येष्ठ तसेच युवा शिवसैनिक अमोल करंगुटकर, विश्वास मयेकर, सूर्यकांत मयेकर, पांडुरंग मयेकर, दिवाकर करंगुटकर, देविदास मयेकर, दिगंबर पांगले, सिद्धेश मयेकर आणि शिवदास करंगुटकर यांच्यासह आंबोळगडमधील स्थानिक पदाधिकारी व मुंबईस्थित पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावाच्या विकासासाठी एकजुटीचा निर्धार

सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय मजबूत करणे आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज राहणे, यावर सभेत भर देण्यात आला.

संघटनात्मक एकजूट, कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासाचा ध्यास या बळावर आंबोळगडच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें