कारभाटले (संगमेश्वर) येथे जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन
संगमेश्वर : श्री कालिश्री देवी ग्रामविकास मंडळ, कारभाटले (पवारवाडी), ता. संगमेश्वर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹२१,००१/-, द्वितीयसाठी ₹१५,००१/-, तृतीयसाठी ₹१०,००१/-, तर चौथ्या क्रमांकासाठी ₹५,००१/– रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. यासोबतच उत्कृष्ट ढोल वादन, निशाण नृत्य, झांज वादन आणि उत्कृष्ट देखावा यासाठी विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गाडी खर्च मंडळाच्या वतीने दिला जाणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.
स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. दिनेश बने यांनी केले आहे.