डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोलीतील आरोग्यसेवेसाठी समर्पित कार्याचा गौरव

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची तातडीची गरज आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक आणि आरोग्य संशोधक डॉ. अभय बंग यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक स्तरावर प्रतिष्ठित संशोधन करणाऱ्या डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांना सन २०२४ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांच्या ११२व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. अभय बंग म्हणाले, “समाजाच्या प्रश्नांवर संशोधन करून उपाय शोधण्याचे कार्य आम्ही गडचिरोलीत सुरू केले. दारूबंदीची मागणीही जनतेतूनच आली आणि आम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला. आमच्या कार्याचे खरे श्रेय आदिवासी जनतेलाच जाते.”

गडचिरोलीतील आरोग्य सेवेपासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या दांपत्याच्या योगदानाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. ‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभावित भागात मूलभूत आरोग्यसेवा पोहोचवल्या आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना त्यांना रुपये पाच लाख, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरुपाचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईतील महात्मा गांधी फाउंडेशनच्या बुक डेपोच्या कार्यासाठी त्यांनी हा निधी देऊ केला.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी बंग दांपत्याच्या संशोधनकार्याची माहिती उपस्थितांसमोर मांडली. डॉ. काकोडकर म्हणाले, “बालमृत्यू, न्यूमोनिया आणि आदिवासी आरोग्यासंबंधी डॉ. बंग यांनी केलेले संशोधन अभूतपूर्व आहे. त्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे.”

यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी बंग दांपत्याच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले, “चव्हाण साहेबांच्या समाजसेवेचा वसा डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग पुढे नेत आहेत. त्यांच्या कार्याने गडचिरोलीतील आरोग्य आणि जनजागृतीमध्ये आमूलाग्र बदल घडला आहे.”

यावेळी ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या मराठी पुरस्काचा अनुवाद असलेल्या ‘माय एनलायटेनिंग हार्ट डिसिज” या डॉ. अभय बंग लिखित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. राणी बंग प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नसल्या तरी त्यांनी दृक्श्राव्य माध्यमातून पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या तीन दशकांच्या कार्याचा आढावा घेतला. केंद्राचे सरचिटणीस हेमंत टकले यांनी पुरस्कार मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी निवड समितीचे सदस्य विवेक सावंत, तसेच चव्हाण सेंटरच्या कोषाध्यक्ष अदिती नलावडे, चव्हाण सेंटरचे विश्वस्त दिलीप वळसे पाटील, जीवनराव गोरे, श्री. बी. के. अगरवाल, जयराज साळगावकर, फरीदा लांबे, माजी महापौर विधी सल्लागार निर्मला सामंत-प्रभावळकर, प्रकाशक रामदास भटकळ चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न