युवा पत्रकार प्रवीण राठोड यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

युवा पत्रकार प्रवीण राठोड यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

banner

सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा आदर्श पत्रकार म्हणून विश्व् 24 न्यूज महाराष्ट्र चॅनलचा नळदुर्ग येथील युवा पत्रकार प्रवीण राठोड यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे व सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांनी माहिती दिली आहे. नळदुर्ग येथील युवा पत्रकार प्रवीण राठोड यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवा पत्रकार प्रवीण राठोड यांचे संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदन होत आहे

अहिल्यानगर प्रतिनिधि नदकुमार बगाडे पाटील

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...