प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आश्विनी कासार यांच्या हस्ते योगाचार्य रेखा विशे यांना “अजिंक्य नारी पुरस्कार” २०२५ प्रदान

महिला दिना निमित्त रोटरी क्लब ऑफ बदलापूरचा पुढाकार
बदलापूर – संदीप शेमणकर
महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बदलापूर त्यांच्या विद्यमानाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या निवडक महिलांचा सन्मान करण्यात आला.योग कार्य क्षेत्रातील योगदाना बद्दल रेखा विशे यांना “अजिंक्य नारी पुरस्कार २०२५” देऊन गौरव करण्यात आला. रेखा विशे या मी सामाजिकदृष्ट्या देखील सक्रिय आहे. शाश्वत उत्क्रांती प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेसाठी स्वयंसेवा करतात. शाश्वत उत्क्रांती प्रतिष्ठान यांचा गरीब मुलांसाठीचा आश्रम आहे इथे बहुतांशी एकट्या मातांच्या मुलांसाठी आश्रम आहे. हा आश्रम कान्होर , बदलापूर येथे हा आश्रम आहे.
रेखा विशे त्यांच्यासाठी देणग्या मिळवण्यास हातभार लावतात.त त्यांना योग शिकवण्यासाठी अधूनमधून तिथे जातात. म्हणून त्यांनी हे सर्व काम विचारात घेतले. आणि त्यांच्या योग आणि सामाजिक कार्याचा आढावा घेत
आश्विनी कासार, एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री यांच्या हस्ते अजिंक्य नारी पुरस्कार २०२५ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संदिप शेमणकर यांच्याशी संवाद साधताना रेखा विशे म्हणाल्या की हे माझे भाग्य समजते. माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत माझे विद्यार्थी, चाहते, रोटरी क्लब ऑफ बदलापूर यांना मी लाख लाख धन्यवाद देते.
मी योग मधे UGC NET ही असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठीची कठीण परीक्षा देखील पास झाली आहे.
माझ्या वर्गात , UGC -NET होणारी मी पहिली विद्यार्थिनी होते.मी गेली १३ वर्षे योगा शिकवण्याचे काम करीत आहे.
पूर्वी मी थिएटर देखील केलेले आहे. मी कायामन योगा सेंटर ची संचालिका आहे.
५००० च्या वर विद्यार्थी माझ्याकडून योग शिकून घेतलेले आहेत. आणि सध्या सेंटर मधे
७० ते ८० साधक ऑनलाईन ऑफलाईन योग शिक्षण घेत आहेत.
मी MA योगशास्त्र त्याच बरोबर मास्टर ऑफ थिएटर आर्टस् ही पदवी घेतलीय. म्हणजे मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. अजिंक्य नारी पुरस्कार मला माझ्या पुढील वाटचालीसाठी मिळालेले ऊर्जा साधन आहे. असे पत्रकार संदीप शेमणकर यांनी त्यांच्याची संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितले.