शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नालासोपारा शहर महिला आघाडीच्या वतीने
“स्त्री कर्तृत्वाला मानाचा मुजरा” विशेष कार्यक्रम संपन्न

नालासोपारा – जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नालासोपारा शहर महिला आघाडीच्या वतीने “स्त्री कर्तृत्वाला मानाचा मुजरा” हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हा कार्यक्रम रविवार, ९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ४.०० ते ८.०० या वेळेत राजा शिवाजी विद्यालय सभागृह, आचोळे, बाबुलपाडा, नालासोपारा (पूर्व) येथे पार पडला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक सौ. रोहिणी डोके यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. रोहिणी डोके मॅडम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या समाजसेवेचे कौतुक करून महिला सशक्तीकरण, कायदेविषयक मार्गदर्शन तसेच भविष्यात सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती आणि सन्मान
कार्यक्रमास शिवसेना पालघर जिल्ह्याचे मार्गदर्शक, माजी जिल्हाप्रमुख शिरीषदादा चव्हाण यांनी उपस्थित राहून महिलांच्या कार्याचा गौरव केला. व्यासपीठावर शहरप्रमुख प्रदीप सावंत, महिला उपजिल्हा संघटक भारती गावडे, तालुका संघटक प्रभामामी सुर्वे, विधानसभा संघटक रेशमा सावंत, शहर संघटक रुचिता विश्वासराव, उपशहरप्रमुख उत्तम तावडे, अनंत घाग, शाखाप्रमुख रामदास धामणक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे “हृदय सत्कार” – यावेळी ज्येष्ठ महिला शिवसैनिक श्रीमती नलिनी चव्हाण, स्मिता कदम, शालिनी जाधव, सावंत मॅडम, श्रीमती अश्विनी मालाडकर, शैला विरकूड, शुभांगी आंबेकर, सुहासिनी तळवनेकर यांचा सन्मान पोलीस उपनिरीक्षक सौ. रोहिणी डोके मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
महिलांसाठी विशेष स्पर्धा आणि मनोरंजन
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महिलांसाठी मनोरंजक खेळ, नृत्य आणि उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये १०० महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला, तर ३५ महिलांनी पारितोषिके जिंकून आपल्या कलागुणांची चमक दाखवली.
उत्साहात सहभागी झालेल्या महिलांचा प्रचंड प्रतिसाद.
या कार्यक्रमात १७५ महिलांनी प्रत्यक्ष हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहरातील सर्व शिवसैनिक महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्त्रीशक्तीचा गौरव अन् एकतेचा संदेश
“स्त्री कर्तृत्वाला मानाचा मुजरा” या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाने महिला सशक्तीकरणाचा संदेश देत स्त्रीशक्तीच्या योगदानाला खरी दाद दिली.
– संदीप शेमणकर

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators