ठाण्याच्या हर्षिता ठोंबरेची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड
ठाणे (✒️संदीप शेमणकर) – ठाणे शहरासाठी अभिमानाची बाब! सौ. आ. के. जोशी शाळेत शिकणारी कु. हर्षिता विनायक ठोंबरे हिने आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे.
रत्नागिरी येथील श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, डेरवण येथे पार पडलेल्या १६ व्या मिनी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्य स्पर्धा २०२५ मध्ये हर्षिताने U-10 रिकर्व प्रकारात ३६० पैकी ३०१ पॉईंट मिळवत उल्लेखनीय प्रदर्शन केले. या कामगिरीच्या जोरावर तिची आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याआधीही हर्षिताने आपल्या कौशल्याने अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
फेब्रुवारी १९, २०२५ रोजी कल्याण येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने रजत पदक पटकावले.
डिसेंबर २०२४ मध्ये मुंबई विद्यापीठ येथे आयोजित SFA Championship स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

हर्षिताच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच तिला मार्गदर्शन करणारे आदरणीय प्रशिक्षक श्रीमंत पाटील सर यांचेही हार्दिक अभिनंदन!
हर्षिता ठोंबरे हिच्या उज्ज्वल भविष्यासाठीअनेक शुभेच्छा!
रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators