दूधदरात वाढ! उद्यापासून ग्राहकांच्या खिशाला चांगलाच ताण
गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपये वाढ होऊन तो 58 रुपये प्रतिलीटर, तर म्हशीचे दूध 75 रुपये प्रतिलीटर दराने मिळणार आहे.
मुंबई: राज्यातील दूधप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी! उद्या (15 मार्च) पासून दूधदरात वाढ होणार असून, ग्राहकांच्या खिशाला अतिरिक्त भुर्दंड बसणार आहे. गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपये वाढ होऊन तो 58 रुपये प्रतिलीटर, तर म्हशीचे दूध 75 रुपये प्रतिलीटर दराने मिळणार आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने हा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. पशुखाद्य, वाहतूक आणि इतर खर्च वाढल्याने दूध उत्पादक अडचणीत आले होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महागाईच्या झळांनी आधीच त्रस्त असलेल्या ग्राहकांसाठी ही दरवाढ चिंतेची बाब ठरणार आहे. आता रोजच्या बजेटमध्ये आणखी वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे दूधदरवाढीचा हा नवा फटका सर्वसामान्य नागरिकांना कितपत झेलता येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारआहे!
दूधदरात वाढ! उद्यापासून ग्राहकांच्या खिशाला चांगलाच ताण