पाचेरीसडा येथे बंधाऱ्याचे जल्लोषात उद्घाटन – विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात!
गुहागर, आबलोली (संदेश कदम) :
गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा पंड्येवाडी येथे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. हा बंधारा स्थानिक शेती आणि जलसंधारणासाठी क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांतदादा भास्करशेठ जाधव यांच्या शुभहस्ते या बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.

भव्य सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती..
या ऐतिहासिक क्षणी जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळ्ये, तालुका प्रमुख सचिनशेठ बाईत, विभाग प्रमुख रविंद्र आंबेकर, शाखा प्रमुख संतोष आंब्रे, युवा सेना प्रमुख सागर डिंगणकर, पंड्येवाडी अध्यक्ष कृष्णा पंड्ये, गावकर पंड्ये, अनिल जोशी, ग्रामपंचायत अधिकारी विश्वनाथ पावरा यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ, महिला व युवक उपस्थित होते.
शेतीसाठी सुवर्णसंधी – पाण्याची टंचाई मिटणार!
या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याचा साठा वाढून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून, गावच्या विकासाला गती मिळणार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करत आमदार भास्करशेठ जाधव यांचे आभार मानले.
स्थानिकांचा उस्फूर्त सहभाग – उत्सवाचे आणि उत्साहाचे स्वरूप!
उद्घाटनाच्या दिवशी गावात उत्सवाचे वातावरण होते. डोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आलेल्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या बंधाऱ्यामुळे गावाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला असून, भविष्यात आणखी विकास प्रकल्प हाती घेतले जातील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
शेती आणि जलसंपत्तीच्या नव्या युगाची सुरुवात!
पाचेरीसडा बंधाऱ्याच्या उभारणीमुळे केवळ शेतीच नव्हे, तर गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे. हा प्रकल्प गावाच्या आर्थिक समृद्धीचा टर्निंग पॉईंट ठरेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या विकास प्रकल्पामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट होणार असून, भविष्यात आणखी प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली जाईल!