अजित पवारांच्या स्नेहभोजनावर आम.भास्कर जाधव यांची तुफान फटकेबाजी
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकणारच आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार
आबलोली (संदेश कदम )
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची धूसफुस आहे ती पुन्हा एकदा दिसून आली अजितदादा पवारांनी जे स्नेहभोजन ठेवले त्या स्नेहभोजनाला फक्त एकटेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले कुठलाही मंत्री किंवा आमदार गेला नाही किंवा तिकडे फिरकलाही नाही याकडे तुम्ही कसे बघता असा प्रश्न गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांना विचारताच भास्करराव जाधव म्हणाले की त्यांचा श्रावण महिना असेल मात्र अजितदादांकडे मांसाहारी जेवण चांगल्या पद्धतीचे असते त्यांनी आणि मी जवळजवळ 15 वर्ष आम्ही एकत्र काम करत होतो उत्तम मांसाहारी जेवण अजित दादा देतात पण, पण त्यांच्या लक्षात नसेल की श्रावण महिना आहे कारण, कारण पवार हे कधी कुठला वार कधी कुठली ती वगैरे काही पाळत नाहीत त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा म्हणून ते गेले नसतील असे मजेदार उत्तर आमदार भास्कर जाधव यांनी दिले आमदार भास्कर जाधव हे गुहागर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद उत्साहात पार पडली यावेळी आमदार भास्कर जाधव हे पत्रकार परिषदेत दिलखुलासपणे बोलत होते नुकत्याच शिंदे गटाच्या मेळाव्यात ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, माजी सभापती विलास वाघे, माजी सभापती दत्ताराम निकम, समीर डिंगणकर आणि कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला याला उत्तर देताना आमदार भास्करराव जाधव म्हणाले की आमदार म्हणाले की चार गेले तरी चाळीस कार्यकर्ते निर्माण करण्याची ताकद माझ्यात आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे आम्ही जिंकणारच असा स्पष्ट निर्धार आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला