कोकण कट्टा आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
तळवली (प्रतिनिधी)…
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली (ता. गुहागर) येथील विद्यार्थ्यांनी कोकण कट्टा या संस्थेच्या वतीने आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कोकण कट्टा संस्थेने २७ फेब्रुवारी – जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली होती. शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सहावी (लहान गट) आणि इयत्ता सातवी ते नववी (मोठा गट) अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजेते:
लहान गट:
प्रथम क्रमांक: कु. मंथन योगेश साळवी (इयत्ता सहावी)
द्वितीय क्रमांक: कु. समर्थ किशोर चिवेलकर (इयत्ता सहावी)
तृतीय क्रमांक: कु. स्वरा प्रवीण साळवी (इयत्ता पाचवी)
मोठा गट:
प्रथम क्रमांक: कु. सायली दत्ताराम पिंपळकर (इयत्ता नववी ब)
द्वितीय क्रमांक: कु. आयुषी सुभाष डाकवे (इयत्ता नववी ब)
तृतीय क्रमांक: कु. दिक्षा महेंद्र पडवळ (इयत्ता नववी अ)
विजेत्यांचा सन्मान मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर, श्री. साळुंके सर, सौ. नाईक मॅडम, श्री. देवरुखकर सर, श्री. केळस्कर सर, श्री. कुळे सर, श्री. गवळी सर यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेचे आयोजन ज्येष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर यांनी केले होते. तसेच श्री. देवरुखकर सर व श्री. कुळे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी श्री. देवरुखकर सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.