तळवली भेळेवाडी मध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमी झाली साजरी .
तळवली (मंगेश जाधव)-गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडी या ठिकाणी सालाबादप्रमाणे गावची ग्रामदेवता आई श्री.सुकाई देवी शिमग्यामध्ये प्रत्येक वाडी मध्ये घरोघरी जावुन दर्शन देते त्यावेळी बहुसंख्येने मुंबई पुणे सातारा तसेच इतर शहरवाशी तसेच नातेवाईक माहेरवशणी या शिमगा सणाला वाडीमध्ये आवर्जून उपस्थित राहातात. आणि ग्रामदेवतेचे दर्शन घेतात व खास वैशिष्ट्ये म्हणजे याच दिवशी रंग पंचमी सण येतो असल्याने त्याचे औचित्य साधुन सर्व लहान थोर आभाळवृध्द या रंग पंचमी सणाचा रंगाची उधळण आनंद घेतात
पुर्वापार चालत आलेली परंपरा जपत आहेत. या वर्षी हिच परंपरा चालु ठेवत रंगाची उधळण करुन घरोघरी देवभेट झाल्यानंतर पालखी आनंदाने नाचवत पालखी मिरवणूक काढली जाते त्यानंतर देवीला गाराणे नवस बोलले जातात त्यानंतर गोड प्रसाद वाटून कार्यक्रमाची मोठ्या उत्साहाने सांगता करण्यात येते