शिमगोत्सव सणानिमित्त खोडदे सहाणवाडी येथे आई इच्छापुर्ती श्री.नवलाईदेवीच्या सहाणेवर विविध कार्यक्रमासह संपन्न.
खोडदे गावातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा.

खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे – मुंबई या मंडळाचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील खोडदे येथील श्री.नवलाईदेवीच्या सहाणेवर होलिकोत्सव – २०२५ या उत्सवा निमित्ताने खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे /मुंबई या मंडळाच्या वतीने खोडदे गावातील ७५ वर्षा पासून पुढील जेष्ठ नागरिकांचा,माता,पिता,बंधू यांना एका छताखाली आणून मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले. हा सन्मान सोहळा, गौरव सोहळा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
यावेळी श्रीमती. लक्ष्मी अनंत साळवी,श्रीमती. सुलोचना परशुराम साळवी, श्रीमती.सिताबाई श्रीधर साळवी, श्रीमती.इंदिराबाई पंढरीनाथ साळवी,श्रीमती.शकुंतला नाना पांचाळ, श्रीमती.सुरेखा राजाराम पांचाळ, श्रीमती. शोभा एकनाथ साळवी,श्रीमती.शारदा वासुदेव साळवी,श्रीमती. अरुणा विष्णू साळवी,श्री. गोपिनाथ रामचंद्र साळवी,अनंत शांताराम साळवी,श्री.प्रभाकर राजाराम साळवी,श्री.वसंत तुकाराम साळवी,श्री.हरिश्चंद्र तुकाराम साळवी,श्री.परशुराम अर्जुन साळवी, यांचेसह नमन वाले ओमकार सितप,स्टेजवाले प्रकाश साळवी, ढाल काठी निशाण लाऊन दिले ते रमेश डिंगणकर, सहाणेवर लायटिंग केली ते स्पिकरवाले सुनिल पवार, आबलोली मधील पत्रकार संदेश कदम,माय कोकण युटूब चॅनलचे संदिप रत्नू मोहिते,विशेष आर्थिक सहकार्य करणारे विनोद रघुनाथ साळवी यांचा मंडळाचे अध्यक्ष विजय महादेव साळवी,अध्यक्ष प्रकाश लक्ष्मण साळवी, सचिव दिपक दत्ताराम साळवी,सचिव राजेंद्र पंढरीनाथ साळवी, उपाध्यक्ष संजय वसंत साळवी, उपाध्यक्ष शरद रघुनाथ साळवी,खजिनदार उदय सुधाकर साळवी, उप सचिव राजेंद्र सिताराम साळवी, उप खजिनदार सुरेश केशव साळवी, सदस्य रवींद्र गणपत साळवी,दशरथ रघुनाथ साळवी, संदेश गजानन साळवी,धनदीप परशुराम साळवी यांचे हस्ते या सर्व सत्कार मूर्तींना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक सुरेश केशव साळवी यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक दशरथ रघुनाथ साळवी यांनी केले.
या सन्मान सोहळ्यानंतर, गौरव सोहळ्या नंतर रात्रौ १०:३० वाजता श्री. कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ वाटद, ता. जि. रत्नागिरी यांचे लोकप्रिय बहुरंगी, बहूढंगी नव्या शैलीतील तालबद्ध खेळे, नविन गाणी आणि वगनाट्य सादर करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाला खोडदे गावातील आणि खोडदे पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने उपस्थित होती.