देवरूखमध्ये डायलिसिस सेंटरचे भव्य उद्घाटन; आमदार शेखर निकम यांच्या हस्ते लोकार्पण

देवरूखमध्ये डायलिसिस सेंटरचे भव्य उद्घाटन; आमदार शेखर निकम यांच्या हस्ते लोकार्पण..

 

देवरूख – ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या विकासात मोठी भर घालत देवरूख येथे डायलिसिस सेंटरचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. मातृमंदिर देवरुख हॉस्पिटल आणि चाळके किडनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या या केंद्राचे लोकार्पण चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने आणि देवरूख नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतन विसपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण आरोग्य सेवेच्या उपलब्धतेमुळे मूत्रपिंड विकाराने त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आता त्यांना उपचारांसाठी दूर जावे लागणार नाही.

आरोग्य हीच खरी संपत्ती’ – आमदार निकम

लोकार्पण सोहळ्यात आमदार शेखर निकम यांनी सामाजिक संस्थांच्या योगदानाचे विशेष कौतुक करत “आरोग्य हीच खरी संपत्ती” असल्याचे अधोरेखित केले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी हा केंद्रबिंदू ठरणार असून, रुग्णांना आधुनिक आणि किफायतशीर उपचार देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.

विशेष मान्यवर आणि प्रमुख उपस्थिती

या सोहळ्यात संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, अध्यक्षा पल्लवी कोरगावकर, चाळके फाउंडेशनचे अनिल चाळके, डॉ. गोरे मॅडम, प्रद्युम्न माने आणि मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष वैद्यनाथ जागुष्टे यांनी मनोगत व्यक्त केले.

याशिवाय, आबा पंदेरे, बंड्या बोरुकर, हनिफशेठ हरचिरकर, बाळु ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, नितीन भोसले, मंगेश बांडागळे, राजू वनकुंद्रे, बंडू जाधव, दिपक खेडेकर, हुसेन बोबडे, बाळू वनकर, रामू शेठ पांदेरे, सचिन मांगले, बबन बोदले, सुबोध पेडणेकर, बाळा माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

या नव्या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता अत्याधुनिक डायलिसिस सेवा स्थानिक पातळीवरच मिळणार असल्याने रुग्णांचे हाल टळणार आहेत. स्थानिक नागरिक आणि रुग्ण परिवारांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें