जैतापूर: शिक्षकाच्या घरात चोरी; 60,500 रुपयांचा ऐवज लंपास
राजापूर – (प्रशांत पोवार वार्ताहर)जैतापूर दळे सडेवाडी येथे एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात अज्ञात चोरट्याने चोरी करून तब्बल 60,500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. 13 मार्च 2025 ते 25 मार्च 2025 या कालावधीत ही चोरी घडली असून, 25 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय चोरीला गेले?
सेवानिवृत्त शिक्षक आनंद महादेव मोरे (वय 61, रा. दळे सडेवाडी, घर क्र. 656, ता. राजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून 30,000 किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 30,000 रोख रक्कम आणि 500 रुपये किमतीचा रेडमी सिम नसलेला मोबाईल असा ऐवज चोरीला गेला आहे.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या कलम 331(3), 331(4) आणि 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, गुन्हा क्र. 18/2025 नोंदवण्यात आला आहे. चोरीप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, परिसरातील संशयित व्यक्तींची चौकशी आणि पुरावे संकलन सुरू आहे.
चोरट्याने घरात कसा प्रवेश केला आणि कोणत्या मार्गाने पळ काढला याचा तपास राजापूर पोलीस करत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कुठलीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.