प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

नवी मुंबई (मंगेश जाधव)

▶️ मराठी मालिका, चित्रपटविश्वातील प्रसिध्द अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे शुक्रवारी दुपारी दीर्घ आजाराने रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री अंजली व मुलगा असा परिवार आहे.

गेल्या 6-7 वर्षापासून त्यांची ब्रेन स्ट्रोक या आजाराबरोबर सुरू असलेली झुंज शुक्रवारी संपली. ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘दामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ते घरा- घरात पोहोचले होते.

16 डिसेंबर 1964 मध्ये त्यांचा जन्म नागपूर येथे झाले. डॉ. उजवणे हे मुळचे नागपूरचे. त्यांचे शालेय शिक्षण नागपूर मध्येच झाले. गव्हमेंट आर्युवेद महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटक, एकांकिकांमधून भूमिका केल्या. त्यानंतर ते पुण्यात स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांत कामं केली. तिथून ते मुंबईत आल्यावर त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केले. नाना ढाकुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या ‘अन्यायाला फुटले शिंग’ या पहिल्याच नाटकाला त्यांना बक्षीस मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रवेश ते सादर करत. एक अधुरा सपना या एकांकिकेसाठी त्यांना बक्षीस मिळाले, त्या बक्षीस समारंभसाठी आले तेव्हा त्यांना चाणक्य मालिकेत भूमिकेची ऑफर मिळाली.

नाती अनोळखी या नाटकात त्यांनी मधु कांबीकर, राहुल सोलापूरकर यांच्या समवेत काम केले. त्यातून कला जगतला त्यांची ओळख झाली. या नाटकानंतर त्यांना जनता जर्नादन या चित्रपटात भूमिका मिळाली. 110 चित्रपटात त्यांनी कामे केले. 140 मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. 67 नाटकांचे त्यांनी सुमारे 3 हजारांहून अधिक प्रयोग केले. विविध पुरस्काराने त्यांचा सन्मानित करण्यात आले होते. मी अभिनेता नसतो तर राजकीय नेता नक्‍की झालो असतो, असे ते सांगत. त्यांच्या योगदानाची दखल घेत, २०२२ साली त्यांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल दिला गेला.

ब्रेन स्‍ट्रोकच्या आजाराने ग्रस्‍त

गेल्या 6 वर्षांपासून ते ब्रेन स्ट्रोक आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी समाजातून हातभार लागला. आजारातून बरे झाल्यावर त्यांनी कुलस्वामिनी या चित्रपटात भूमिका केली होती. अलीकडे पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे पुन्हा त्यांना रूग्णालयात भर्ती केली होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात