राज्यात ‘आनंद गुरुकुल’ पॅटर्नचा अमल!
२१व्या शतकातील गरजांनुसार शालेय शिक्षणात क्रांतिकारी पाऊल; नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी
मुंबई – राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शालेय शिक्षण विभागाने ‘आनंद गुरुकुल’ या नावाने नवीन निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक शैक्षणिक विभागात अशा शाळा सुरू होणार असून, २०० हून अधिक विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळांमध्ये नववी ते बारावी वर्गांचा समावेश करण्यात येणार आहे.
या गुरुकुल पद्धतीत पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच २१व्या शतकातील कौशल्यांचा समावेश असणार आहे. यात क्रीडा, कला, विज्ञान व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास यासारख्या विषयांच्या विशेष नैपुण्य शाखांचा समावेश असेल.
या योजनेची अंमलबजावणी सुस्थितीत व विकासक्षम अशा विद्यानिकेतन-प्रमाणेच सुविधायुक्त शाळांमध्ये होणार आहे. प्रत्येक विभागातून अशा एक शाळेची निवड केली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा पुरवली जाणार आहे.
शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त करण्यात आला असून, दिनदर्शिका, प्रवेशप्रक्रिया, अभ्यासक्रम आणि निधीवाटप यावर सविस्तर अहवाल तयार करून शासनाला सादर केला जाणार आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक क्षेत्रात भक्कम पाया मिळणार आहे.
#आनंदगुरुकुल #शालेयशिक्षण #गुरुकुलपद्धत #२१व्यासद्यशिक्षण #नववटेबारावी #शासकीयविद्यानिकेतन #AIinEducation #कौशल्यविकास #MaharashtraEducation