राष्ट्रीय पंचायत राज दिनी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके विशेष पुरस्काराने सन्मानित
आबलोली (संदेश कदम) पंचायत समिती गुहागर सामान्य प्रशासन विभाग “राष्ट्रीय पंचायत राज” दिना निमित्त गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायत येथे पंचायत समिती स्तरावर भव्य दिव्य कार्यक्रमात विशेष पुरस्कार देऊन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे,विस्तार अधिकारी भांड, खामशेतचे सरपंच मंगेश सोलकर यांचे प्रमुख उपस्थितीत,सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांचे हस्ते गुहागर तालुक्यातील आबलोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी विचार पीठावर खामशेत ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.