“सिंधुदुर्गला पहिल्या तिघांमध्ये आणू” – गुंतवणूक परिषदेत पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचा विश्वास
गुंतवणूक, रोजगार, पर्यटन व कृषी क्षेत्रात सिंधुदुर्ग अग्रेसर होईल; जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५ संपन्न
सिंधुदुर्गनगरी | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५ सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सभागृहात संपन्न झाली. या परिषदेत मंत्री आ नितेश राणे यांनी उपस्थित राहून गुंतवणूकदारांना मार्गदर्शन केले.
“सिंधुदुर्गला प्रत्येक बाबतीत अग्रेसर ठेवण्याचा आमचा निश्चय आहे. गुंतवणूक, रोजगार निर्मिती, पर्यटन व कृषी क्षेत्र या सर्वच क्षेत्रांमध्ये सिंधुदुर्ग पुढच्या पाच वर्षांत राज्यात पहिल्या तीन क्रमांकात राहील, यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत,” असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
या वेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, व्यवस्थापक रवींद्र पत्की यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#Sindhudurg #उद्योगपरिषद2025 #उदयसामंत #सिंधुदुर्गविकास #गुंतवणूकपरिषद #सिंधुदुर्गबातम्या # #niteshrane निलेश राणे