राजापुर: श्री. माणेश्वर यात्रोत्सव उत्साहात संपन्न!
भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेने झाला रंगतदार समारोप; हजारो भक्तांच्या साक्षीने भाविकतेचा उत्सव

✍️ राजू सागवेकर | राजापूर
राजापूर तालुक्यातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री. माणेश्वर मंदिराचा वार्षिक यात्रोत्सव यंदाही उत्साहात पार पडला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी 8 वाजता मंत्रोच्चारात अभिषेक, 10 वाजता महापूजा, दुपारी महाप्रसाद व हळदीकुंकू अशा धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिभावाने भरलेला दिवस गेला.
सायंकाळी 4 वाजता स्थानिक भजनी मंडळांच्या भक्तिरसपूर्ण सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले, तर 7 वाजता ‘साई म्युझिकल शो’मध्ये कु. अभिषेक शिरवडकर यांच्या सुस्वर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
रात्री 10 वाजता झालेली भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरली. सोलो आणि ग्रुप डान्स अशा दोन विभागांमध्ये एकूण ३० स्पर्धकांनी भाग घेतला.
सोलो डान्स विभागातील विजेते:
प्रथम: श्राव्या पाटणकर, मुंबई – ₹3333 व चषक
द्वितीय: नेत्रा आंबेरकर, राजापूर – ₹2222 व चषक
तृतीय: आकांक्षा मुळम, तारळ – ₹1111 व चषक
उत्तेजनार्थ: कृपा सूद, राजापूर – ₹555 व चषक
ग्रुप डान्स विभागातील विजेते:
प्रथम: जानशी हायस्कूल ग्रुप – ₹5555 व चषक
द्वितीय: आई जुगाई कला मंच, रत्नागिरी – ₹3333 व चषक
तृतीय: संस्कृती ग्रुप, म्हैसासुरवाडी-अनसुरे – ₹2222 व चषक
उत्तेजनार्थ: सेवेन स्टार्स ग्रुप, करेल – ₹1111 व चषक
सर्व स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यात्रोत्सवात भक्ती, कला आणि सांस्कृतिक रंगांची उधळण झाली. आयोजन यशस्वी झाल्याबद्दल ग्रामस्थ, समिती सदस्य व स्वयंसेवकांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
—
#माणेश्वरयात्रा #राजापूर #डान्सस्पर्धा #भक्तिरस #सांस्कृतिकउत्सव #RatnagiriNews #KonkanCulture