उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोकण दौरा
१७ ते १९ मेदरम्यान चिपळूण, गुहागर, दापोलीतील धार्मिक व खाजगी भेटी; १९ मे रोजी कोल्हापूरला प्रयाण
रत्नागिरी, १४ मे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शनिवार १७ मे ते सोमवार १९ मे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून चिपळूण, गुहागर व दापोली येथे विविध धार्मिक व खाजगी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
शनिवारी (१७ मे) सकाळी ९ वाजता महाबळेश्वर येथून मंत्री पाटील वाहनाने चिपळूणकडे प्रयाण करतील. सकाळी ११.१५ वाजता विंध्यवासिनी मंदिर, चिपळूण येथे दर्शनाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १२.१५ वाजता गुहागर येथील श्री देव व्याडेश्वर मंदिरात भेट देतील. दुपारी ४ वाजता दापोली येथे खासगी सचिव अतुल खानोलकर यांच्या निवासस्थानी थांबून, सायंकाळी ७ वाजता चिरा मिडोज इकोरिसॉर्ट, ब्राम्हणवाडी येथे मुक्काम करतील.
रविवार (१८ मे) सकाळपासून चिरा मिडोज येथेच वेळ राखीव असून, दुपारी १२ वाजता लोवरेवाडी-वणंदगाव येथे भेट देतील. त्यानंतर पुन्हा चिरा मिडोज रिसॉर्ट येथे परत येतील व तेथे मुक्कामी थांबतील.
सोमवार (१९ मे) सकाळी ८ वाजता पाटण-कराड मार्गे कोल्हापूरकडे त्यांच्या दौऱ्याचे पुढचे टप्पे सुरू होतील.
#चंद्रकांतपाटील #रत्नागिरीदौरा #दापोली #गुहागर #चिपळूण #राजकीयदौरा #मंत्रीदौरा
फोटो