ब्राह्मोससमोर चिनी संरक्षण फोल! “ऑपरेशन सिंदूर”ने पाकिस्तानची स्थिती संकटात – माजी अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांचे विधान
भारताची आक्रमक लष्करी रणनीती यशस्वी; ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानातील हवाई संरक्षण यंत्रणा निष्प्रभ
बातमी सविस्तर.
“ऑपरेशन सिंदूर”च्या पार्श्वभूमीवर, भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनी पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी आणि चिनी हवाई संरक्षण यंत्रणा सहज भेदल्या, असे मत अमेरिकन लष्करी तज्ञ कर्नल (निवृत्त) जॉन स्पेन्सर यांनी व्यक्त केले.
स्पेन्सर म्हणाले, “पाकिस्तानच्या चिनी हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या प्रगत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसमोर फोल ठरल्या. याचा अर्थ असा की भारताकडे पाकिस्तानात कुठेही आणि कधीही आघात करण्याची ताकद आहे.”
मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा नायनाट करताना भारताने १० मे रोजी पाकिस्तानातील ११ लष्करी हवाई तळांवर हल्ले केले. हे हल्ले ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या मदतीने पार पडले. यापूर्वी ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करताना भारताने चिनी बनावटीच्या संरक्षण तळांवर अचूक हल्ले केले होते.
स्पेन्सर पुढे म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारताचा संदेश स्पष्ट होता – आम्ही युद्ध नको म्हणतो, पण दहशतवाद सहन करणार नाही.”
ते मॉडर्न वॉर इन्स्टिट्यूटमध्ये शहरी युद्ध अभ्यासाचे अध्यक्ष असून, भारताच्या या प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणेला त्यांनी जागतिक दर्जाचे मानले.
हॅशटॅग्स:
#OperationSindoor #BrahMos #IndianArmy #ChinaDefense #PakistanAirstrike #IndiaStrikesBack #ModernWarfare #DefenseNews #RatnagiriVartahar
फोटो