राजनाथ सिंह यांची भूजला धडक! “२३ मिनिटांत शत्रूचा नाश केला, ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही”
संरक्षण मंत्र्यांचा भूज हवाई दल तळाला दौरा; भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे जोरदार कौतुक
दिल्ली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज गुजरातमधील भूज हवाई दल तळाला भेट देत ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने दाखवलेल्या पराक्रमाचे कौतुक केले. त्यांनी शूर हवाई योद्ध्यांशी संवाद साधत, ऑपरेशनमधील भारतीय सामर्थ्याची जगाला दाखवलेली झलक अधोरेखित केली.
राजनाथ सिंह म्हणाले, “दहशतवादाविरुद्धच्या या मोहिमेचे नेतृत्व भारतीय हवाई दलाने केलं. केवळ २३ मिनिटांत त्यांनी शत्रूवर वर्चस्व गाजवले आणि त्यांचा नाश केला. शत्रूच्या हद्दीत क्षेपणास्त्रे डागली गेली, तेव्हा जगाने भारताच्या शौर्याचे प्रतिध्वनी ऐकले.”
त्यांनी स्पष्ट केलं की भारताचे युद्धतंत्र आता बदलले आहे. “आपण फक्त आयात केलेल्या शस्त्रांवर अवलंबून नाही. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून तयार झालेली शस्त्रसज्जता आता आपल्या लष्करी सामर्थ्याचा मजबूत भाग बनली आहे.”
दहशतवादाविरुद्धचा लढा ही भारताची नवीन सामान्यता
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “भारताचा दहशतवादाविरुद्धचा लढा केवळ सुरक्षा विषय नाही, तर तो राष्ट्रीय संरक्षणाच्या मूलतत्त्वात सामील झाला आहे. पाकिस्तानवर आम्ही युद्धबंदीच्या माध्यमातून लक्ष ठेवतो आहोत. त्यांच्या वर्तनावरूनच त्यांचं भविष्य ठरेल.”
“ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. आतापर्यंत पाहिलेलं फक्त ट्रेलर होतं, गरज पडली तर आम्ही संपूर्ण चित्र दाखवू,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
हॅशटॅग्स:
#RajnathSingh #BhujaAirBase #OperationSindoor #IndianAirForce #DefenceNews #IAFStrikes #TerrorismFreeIndia #MakeInIndiaDefence #RatnagiriVartahar
फोटो