कोरोनाची नवी लाट? हाँगकाँग-सिंगापूरमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; आशियात भीतीचं वातावरण!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाची नवी लाट? हाँगकाँग-सिंगापूरमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; आशियात भीतीचं वातावरण!

 

आरोग्य यंत्रणा अलर्टवर; सांडपाण्यातून विषाणूचा प्रसार? लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचा संशय

 

नवीदिल्ली – आशिया खंडात पुन्हा कोरोनाची भीती वाढताना दिसतेय. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यानं प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली असून, तिला कोरोनाची नवी लाट मानलं जातंय.

 

हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शहरात संसर्गाचा दर वेगाने वाढतोय. ३ मे पर्यंतच्या आठवड्यात ३१ गंभीर रुग्णांची नोंद झाली आहे. सांडपाण्यातून विषाणूचा प्रसार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

 

दुसरीकडे, सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, याच आठवड्यात करोना रुग्णांमध्ये २८% वाढ झाली असून एकूण संख्या १४,२०० वर पोहोचली आहे. यातील ३०% रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

 

आरोग्य विभागाचा अंदाज आहे की, लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने संक्रमण झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या लाटेबाबतही अजून कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही; मात्र ही लाट अधिक संसर्गजन्य किंवा जीवघेणी ठरेल का, याबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क आहे.

 

 

 

#CoronaAlert #Covid19Wave #HongKong #Singapore #AsiaCovidUpdate #HealthNews #कोरोना #सावधान

 

फोटो

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...